लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरा बायकोने पक्के ठरवून टाकले की कोणी ही दरवाजा ठोठावला तरी दार उघडायचे नाहि. सर्वात प्रथम नव-याच्या आई-बाबांनी दार ठोठावले पण त्या दोघात ठरल्या प्रमाणे दार बंद राहिले, काही वेळाने बायकोच्या आई-बाबांनी दार ठोठावले पण दार बंद. आत बायकोची घालमेल नव-याला जाणवली. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने शेवटी दार उघडले आणि आई-बाबांना भेटलीच. नव-याने काही प्रतिक्रिया दिली नाही. काही वर्षे गेली. त्यांना ४ मुलगे झाले आणि ५ व्यांदा मुलगी झाली. बापाने सर्वांना बोलावून मोठी पार्टी दिली. पार्टी संपल्या वर बायकोने विचारले, मुलांच्या जन्माच्या वेळी आपण ऐवढी मोठी पार्टी नाही केली मग मुली साठी ………?? बापाने हसत हसत उत्तर दिले की ते एकच अपत्य असे आहे की जे आपल्या साठी दार उघडेल…… मुलगी कुटुंबा साठी खास असते...!
No comments:
Post a Comment